Share

मकरंद अनासपुरे यांचा अखेर राजकारणात प्रवेश !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण भारतात सिनेमातील सुपरस्टार्स राजकारणात येऊन यशस्वी होण्याची अनेक उदाहरणे आहेत. नुकतेच सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत यांनीही आपले राजकीय पक्ष काढले आहेत. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून मराठीतील सुपरस्टार मकरंद अनासपुरेंंनेही महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं नशीब आजमावयचे ठरविले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेला असताना, त्यांच्या हक्कांसाठी मकरंद अनासपुरेने आता राजकारणात उडी घ्यायचे ठरविले आहे. १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची स्थापना मकरंद करणार असून, २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही आपण या पक्षामार्फत लढविणार असल्याचे संकेतही मकरंदने केले आहे.

नाम या संस्थेचे काम करत असताना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. इतकी वर्षे झाली, तरी महाराष्ट्रातील एकही राजकीय पक्षाला शेतकºयांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. आजही महाराष्ट्रात शेतकºयांचे आत्महत्यासत्र सुरू असून, शेतकºयांना त्यांच्या न्यायहक्कांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि सत्तेत आल्यावर शेतकºयांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवूनच नंतर बाकीचे प्रश्न हाताळावेत, हा माझा आणि माझ्या पक्षाचा अजेंडा असेल,’ असे मत मकरंद अनासपुरेने व्यक्त केले आहे.

नेहमीच ‘सिरिअसली’ बातम्या वाचणाऱ्या वाचकांना हा गोड धक्का देण्याचा छोटासा प्रयत्न. निमित्त अर्थातच आजच्या ‘एप्रिल फूल’ चे. डोण्ड टेक इट सिरिअसली…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!