Share

धनंजय मुंडेंनी कोरोनाला हरवलं, आज रुग्णालयातून घरी परतणार

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज त्यांना घरी सोडले जाणार आहे. १२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एक मराठा, लाख मराठा ; आरक्षणातून तब्बल १२८ जण झाले अधिकारी

गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून आज ते आपल्या घरी परततील. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वीच बीडहून मुंबईत परतले होते. ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते. यादरम्यान धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान रविवारी झाले असून सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६५ हजार ७४४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मटका व्यवसायात वडिलांनी जिव गमवला, मुलागा जिद्दीने लढून नायब तहसीलदार बनला

राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!