औरंगाबाद : आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कार्यक्रमाला उपस्थित आजी माजी आणि भावी सहकारी या विधानाचा पुनरुच्चार केला. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेत त्यांना चिमटा काढला. ‘मला माजी मंत्री म्हणू नका. पुढच्या दोन-तीन दिवसांत बघा काय होतंय,’ असं म्हणत पाटील यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते.
याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांनी काल मला माजी मंत्री म्हणू नका, असं म्हटलं. माझ्या कानावर असं आलंय की चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत,’ असं भाष्य करत ठाकरेंनी स्मितहास्य केले. दरम्यान, त्यांनी ही मिश्किल टिपण्णी केली असली तरी शिवसेना-भाजपच्या युतीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरडी कोसळण्याच्या जागांचा शोध घेण्यासाठी नव्या समितीचे कागदी घोडे नाचवू नका’
- ‘अजितदादा पवार हे केवळ शब्द देणारे, आश्वासन देणारे नेते नसून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे नेते आहेत’
- मोदींचा वाढदिवस युथ कॉंग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार
- ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी; केंद्रीय मंत्र्याचे आवाहन
- ‘आजी, माजी आणि भावी सहकारी’ मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

