Share

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येच मतभेद,अजितदादा म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नाशिक- काही निवडणुकीतील पराभव पाहून कॉंग्रेस सह अनेक पक्ष इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला विरोध करत आलेले आहेत.या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय/सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कायदा महाराष्ट्र विधानमंडळाने तयार करावा अशा स्पष्ट सुचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पदावर असताना दिल्या होत्या. मात्र आता पुन्हा या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येच मतभेद दिसून येत आहेत.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी आज आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. ईव्हीएम मतांची अचूक संख्या दाखवते हे आपल्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो असे महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बुधवारी सांगितले.

बऱ्याचदा विविध पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? चांगलं बहुमत मिळालं तर सर्व काही ठीक आहे आणि जर खूप जास्त मतांच्या फरकाने पराभव झाला, डिपॉझिट जप्त झालं तर म्हणातात ईव्हीएम मॅनेज केलं आहे. मात्र असं काही नाही ईव्हीएम ठीक सुरू आहे, पेपरलेस काम होतं. माझा तरी ईव्हीएमवर संपूर्ण विश्वास आहे.” असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, पटोले यांनी सूचना केल्यानंतर भाजपने जोरदार टीका केली होती.विधानसभा आणि विधानसभा अध्यक्षांनी काय करावं हे नियम घालून देण्यात आलेले आहेत. निवडणूक हा विषय केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असतो. आपला देश सुधारणेकडे चालला आहे. त्यामुळं मतपत्रिकेवरुन आपण ईव्हीएम आणलं. आता उलटा प्रवास करण्याचा प्रयत्न दिसतोय अस वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं होतं.

दरम्यान,काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर त्यावेळी जोरदार टीकास्त्र डागले होते. भारतीय जनता पक्षाची पोटदुखी वेगळी आहे त्यांचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता दाखवण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याचं मूळ ईव्हीएम आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संविधानिक पदावर आहेत त्यांना जे अधिकार प्राप्त झालेल्या त्या अन्वये त्यांनी सध्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला सूचना केली आहे. मतपत्रिकांचा वापर व्हावा यासाठी कायदा करावा. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाची देखील भूमिका आहे.” असं सचिन सावंत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!