Share

कई तुफानों का रुख मोड चुका हुँ! खासदार संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

Published On: 

मुंबई: मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत आणि संजय राऊत यांच्यात मोठे शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. मुंबई ही मराठी माणसानचीच आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. याव्यतिरिक्त महाविकास आघाडी सरकार काही मंत्र्यांनीसुद्धा कंगना राणावतवर टिका केली होती. कंगणावर टिका करताना संजय राऊतांनी ‘हरामखोर मुलगी’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी राऊतांना धारेवर धरले आहे.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी जर कंगणाने महाराष्ट्राची माफी मागितली तर, मी तिचीदेखील माफी मागण्याचा विचार करेन असं म्हटलं आहे. कंगनाने मुंबईला पाकिस्तान म्हटल, तेच गुजरातच्या अहमदाबादला बोलायची हिम्मत तिच्यात आहे का? असा सवाल यावेळी राऊतांनी केला. खासदार संजय राऊतांनी कंगणाला हरामखोर म्हटल्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री दिया मिर्झा यांनी ट्विट करत हे विधान योग्य नसल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांनी कंगणाची माफी मागावी, असं अभिनेत्री दिया मिर्झाने ट्विटमध्ये नमूद केले आहे.

 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबाहेरील सरकारकडे सुरक्षेची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊतांनी कंगनावर आखपाखड केली होती. सुशांतसिंगच्या प्रकरणानंतर कंपनाने बॉलिवूडमधील काही मोठ्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांंविरोधात उघडपणे बोलायला सुरूवात केल्यानंतर तिने सुरक्षा मागितली होती.

२९ आमदार अन ८ मंत्र्यांना झालाय कोरोना, पावसाळी अधिवेशन कसे घेणार ठाकरे सरकार

दरम्यान बॉलिवूडमधील मोठे अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री ड्रग्जचं सेवन करत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून आता वादंग सुरू झाले आहे. कंगणाने सुशांतसिंग प्रकरणावरुन सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर सुद्धा आरोप केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

कंगना रणौत-शिवसेना वाद शमणार? राऊत म्हणाले…

यामध्ये ‘तनू वेड्स मनु’ ‘मणिकर्णीका’ ‘क्विन’ ‘क्रिश 3’ अशा अनेक चित्रपटांंमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना राणावतने एक वादग्रस्त ट्विट केले होते, ज्यामध्ये मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशी टीका केली होती. यानंतर नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.

..तर जम्बो रुग्णालयाचे काम दुसऱ्यांना द्या ; अजित पवारांनी सुनावले

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!