मुंबई : अयोध्येत राम मंदिराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमी पूजन होणार आहे. सुमारे पावणे दोनशे लोक त्यासाठी उपस्थित राहणार आहे. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले आहेत. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनुष्ठानाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सहा तासांचं विशेष अनुष्ठान केलं जात आहे. आज सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार असून शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आले आहेत.
राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या भूमिपूजनाबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नियतीने माझ्याकडून रथयात्रा घडवली हे मी माझं भाग्य समजतो. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे असंही लालकृष्ण आडवाणी यांनी म्हणत कृतज्ञता व्यक्त केली आहे. “राम मंदिर उभं राहिल्यानं आपल्या देशाची प्रतिमा जगात उंचावेल, एक बलशाली देश, भरभराट करणारा शांतीप्रिय देश अशी आपली नवी ओळख निर्माण होईल असा विश्वास वाटतो” असंही आडवाणींनी म्हटलं आहे.
‘बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, आज या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते’
अयोध्येत बुधवारी प्रभू रामचंद्र मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळी साजरी केली जाते आहे. हे मंदिर घडतं आहे यामागे सर्वात मोठी प्रेरणा आहे ती लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेची. १९९० मध्ये त्यांनी रथयात्रा काढली तेव्हापासूनच या क्षणाची सगळेजण वाट बघत होते.
राज्यात आज एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंतची विक्रमी संख्या


