Share

‘जेवण बनवताना माझी दोन बोटं कापली..’असे म्हणत इलियानाने केले मन मोकळं

Published On: 

मुंबई : सध्या चित्रपटामुळे नव्हे तर कुकिंगमुळे चर्चेत आलेली टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज. तसेच तिचा अभिनय सगळ्यांना खूप आवडतो. मात्र इलियानासोबत किचनमध्ये अशी एक घटना घडली आहे की, ज्यामुळे ती लहान मुलांप्रमाणे रडताना दिसली होती.  ही माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली असून चाहत्यांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती.

दरम्यान इलियाना किचनमध्ये जेवण बनवताना चुकून तिची दोन बोटं कापते. याबाबत तिने तिच्या चाहत्यांसोबत पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की,’मी जेवण बनवताना माझी दोन बोटं कापली आहेत. बॅंडेज लावताना मी अगदी लहान मुलांप्रमाणे रडत होते.’ यानंतर तिने फॉलोअप पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, ‘असे पहिल्या वेळेस झाले नाही. या आधी देखील अनेकवेळा तिची बोटं कापली आहेत.’ यानंतर तिने सांगितले की, तिची बोटं आता ठीक आहेत. यासोबत तिने सांगितले की,’रडण्यात कसली लाज..’

अलिकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती विमानतळावर फोटोग्राफरसोबत बोलताना दिसत होती. यावेळी ती त्याला मास्क नीट लावण्याचा सल्ला देत होती. तिच्या या व्हिडिओला देखील तिच्या चाहत्यांनी पसंती दर्शवून तिचे कौतुक केले होते. इलियानाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने २०१२ साली ‘बर्फी’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर ‘फटा पोस्टर निकला हीरो’, ‘मैं तेरा हिरो’ अशा बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!