टीम महाराष्ट्र देशा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडीवर सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे आपण त्यांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं मत माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
संसदेत एका घरातील दोन खासदार असू शकत नाहीत. पक्ष तसा निर्णयही घेऊ शकणार नाही, याची आपल्याला माहिती होती, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात आपला कोणताही प्रश्न नाही. मात्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्वाही दिली असून आपलीही त्यादृष्टीने तयारी आहे. त्यामुळे आपण त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जिल्हा बॅंक आणि जिल्हा दूध संघात गेल्या वेळी सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून कामकाज करण्यात आलं. ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे यापुढेही सहकार क्षेत्रातील काम सर्वपक्षीय असण्याची गरज आहे. आगामी जिल्हा बॅंक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच असावं, असंच आपलं मत आहे. त्या माध्यमातून चांगले कामकाज होऊ शकेल, असंही खडसे म्हणाले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

