मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान तसेच इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे. येत्या 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देईल. दरम्यान, सुनावणी पूर्ण झालेली असली तरी आर्यन खानचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच असणार आहे.
मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला तो एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.NCB चे वकिल अनिल सिंह यांनी सांगितलं की, आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे पुढील 6 दिवस त्याला तुरुंगात राहावं लागणार आहे. त्यानंतर याप्रकरणी काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आर्यन खानच्या अटकेनंतर शारुखच्या जुन्या मुलाखती आता व्हायरल होत आहेत. त्यातच शाहरूख खानची एक मुलाखत आता व्हायरल होत आहे. त्यात शाहरुखने मी चांगला वडील नसल्याचे म्हंटले होते. यावेळी शाहरुख खानने लहान मुलगा अब्रामबद्दल सांगितले होते की त्याने एक दिवस अब्रामला बोलावले पण तो शाहरुखकडे आला नाही. त्यानंतर शाहरुखच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले.
शाहरुख खानने एकदा माध्यमांसोबत बोलताना सांगितले, ‘मी एक दिवस अब्रामसोबत बसलो होतो. मी त्याला माझ्या जवळ बसायला सांगितले. पण तो तिथून निघून गेला, माझ्या जवळ येऊन बसला नाही. म्हणून मी असे विचार करू लागलो की मी एक चांगला वडील नाही! मी माझ्या मुलांवर प्रेम केलं नाही? पुढे शाहरुख म्हणाला, ‘मी माझ्या कामाला जास्त वेळ देतो का? मी मुलांना वेळ देऊ शकत नाही. एक दिवस तो एका मुलीसोबत उभा राहील आणि मला सोडून जाईल.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईटचे लाँचिंग
- ‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पुण्यातील कब्बडीपटू मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी
- ‘अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार’, किरीट सोमय्यांचा दावा


