Share

मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरेल ; दिल्लीमध्ये अमित शहांनी मरकजला कशी काय परवानगी दिली?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात लोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. दिल्ली मध्ये तबलिगी समाजाच्या मरकज मधील लोकांना कोरोना झाल्याची घटना समोर आली आणि आता यावरून राजकारणही तापलं आहे. भाजपच्या प्रसाद लाड यांनी मंत्री जितेंद्र आव्हाडांना तबलिकीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. आता आव्हाडांनी त्याला सणसणीत उत्तर दिलं आहे.

‘काल पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर अनेकांनी मला तबलिकीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. अनेकांनी पातळी सोडून टीका केली. मात्र मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार’, असं सणसणीत प्रत्युत्तर त्यांनी टीकाकारांना दिलं आहे.

जेव्हा जे बोलायचं असतं ते मी बोलतो. मी दलालीच्या धंद्यात नाही. उपाशी मरेल पण मी माझ्या निष्ठा गहान ठेवणार नाही. निष्ठेत कधीही तडजोड करणार नाही. मशीदीला लॉक लावलं पाहिजे, हे पहिल्यांदा मी म्हटलं. मुम्ब्र्यात आर्मी आली पाहिजे हे मी कमिशनरांविरोधात जाऊन सांगितलं. हिंदू वस्तीत आणि मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन मी जनजागृती केली. माणसं मरतायेत. ती कोणच्या धर्माची मरतायेत हे बघून जर आपण आपलं काम ठरवणार असू तर मात्र अवघड आहे. प्रश्न हिंदू-मुस्लिमांचा नाहीये. प्रश्न मानवतेचा आहे. कोरोना आलाच आहे तीच मानवता बघण्यासाठी, अशा शब्दात टीकाकारांचा आव्हाडांनी समाचार घेतला आहे.

महाराष्टाच्या सरकारने वसईत होणाऱ्या मरकजला परवानगी नाकारली. आम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला. मात्र दिल्लीमध्ये तो कार्यक्रम पार पडला. अमित शहांनी कशी काय परवानगी दिली? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

मी हिंदू आहे याचं सर्टिफिकेट मला स्वत:ची विक्रीव्यवस्था करणाऱ्यांनी देऊ नये. मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरेल. मला कुणी अक्कल शिकवू नये, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

https://twitter.com/AwhadOffice/status/1246392956816261121

https://twitter.com/AwhadOffice/status/1246393387927752705

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!