मुंबई : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव विजबिलात दिवाळीमध्ये गोड बातमी दिली जाईल असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अचानक युटर्न घेत विज बिल भरावेच लागेल असं म्हणल्यामुळे अव्वाच्या-सव्वा बिल आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे.
यावरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरत असतानाच सरकारमधील मंत्री मात्र याचं खापरं भाजपवरच फोडत आहेत. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या थकबाकीमुळेच महावितरण सद्या आर्थिक तोट्यात असून वीजबिल माफी करण्यास अधिक पॅकेज व राज्य सरकारला कर्ज काढावे लागेल असे या मंत्र्यांनी सांगितले.
आता, नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यूत विभागाच्या आर्थिक स्थितीची माहिती देतानाच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. महावितरणची मार्च 2014ची अखेरची थकबाकी 14 हजार 154 कोटी होती. ही थकबाकी आता 59 हजार 14 कोटी इतकी आहे. त्यामुळे या विषयावर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यासोबतच, 100 युनिट वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हणालो होतो. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही. आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार असून 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल, असा विश्वास देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केसीआर हे पंतप्रधान मोदींच्या तालावर नाचतात, काँग्रेसचा जोरदार घणाघात !
- Kia च्या ‘या’ मॉडेलमध्ये आढळला दोष; कंपनीने गाड्या परत मागवल्या
- ‘भाजप सरकारच्या काळात सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झालीय’
- ‘सिर्फ़ बातों की है मोदी सरकार, कुचल रही ग़रीबों के अधिकार’
- कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी वरवरा राव यांना ‘नानावटी’मध्ये हलवले


