टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आणि विशेषकरून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. रोजच्या रोज मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढत आहे.
आता याच अनुशंघाने मुंबई मधील काही भागात हायड्रोक्लोरोक्विन औषध लोकांना दिली जाणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते असेही दिसून आलं आहे. त्यामुळे या गोळ्या देण्यात येणार आहेत.
परतू असं असल तरी ६० वर्षांवरील आणि १५ वर्षांखालील व्यक्तींना या गोळ्या दिल्या जाणार नाही अशीही माहिती टोपे यांनी दिली आहे, ते ट्वीटरवर म्हणाले,
‘मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत आहे.’
‘हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात ह्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे.ज्यांना हृदयविकार आहे किंवा ६० वर्षांवरील आणि १५ वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत.’
मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत आहे. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2020
हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात ह्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे.ज्यांना हृदयविकार आहे किंवा ६० वर्षांवरील आणि १५ वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

