🕒 1 min read
मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुलाब चक्रिवादळ आज संध्याकाळी उत्तर आंध्रप्रदेशातील कलिंगपट्टम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही याचा परिणाम जाणवणार असून राज्यात चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासांत सात किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे गुलाब चक्रिवादळ तीव्र झाले आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागासाठी प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज संध्याकाळच्या सुमारास हे चक्रिवादळ धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागात प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
चक्रीवादळामुळे राज्यात चार दिवस पाऊस
गुलाब चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश व ओडिशा राज्यातील किनारपट्टी भागात चक्रिवादळाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या चक्रिवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावरही पडणार असून राज्यात चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने म्हंटले आहे की, वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गुलाब चक्रिवादळ तीव्र झाले आहे. यादरम्यान रस्ते वाहतूक व वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला’ राऊतांची भाजपवर टोलेबाजी
- कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
