बीड : करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच चालकालाही १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अॅट्रॉसिटीसंदर्भात ही सुनावणी पार पडली आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम ३०७ आणि एट्रोसिटी कायद्याखाली करुणा शर्मासह आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, परळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, रविवारी परळीत आल्यावर करुणा यांना वैद्यनाथ मंदिरासमोर जमावाने त्यांना रोखले तेव्हा काही महिलांनी आम्ही वेगवेगळ्या जाती-समूहाच्या असून धनंजय मुंडे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर तुम्ही बेछूट आरोप करू नका, असे म्हटले. यावेळी करुणा यांनी जातिवाचक शिवीगाळ केली तर याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या अरुण मोरे याने बेबी तांबोळी या महिलेवर चाकूहल्ला केला. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राआधारे विशाखा घाडगे यांच्या फिर्यादीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्याविरोधात अट्रोसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, करुणा शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. करुणा यांच्या तक्रारीवरून जवळपास दोनशे जणांवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली. त्यामुळे करुणा या तर गुन्ह्यात अडकून सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांनी दोनशे जणांवर गुन्हा दाखल करून त्यांनाही कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडले आहे. यामुळे ‘हम तो डुबे सनम, ले तुमको भी डुबेंगे’ अशी चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवात मुंबई, पुण्यात नवे निर्बंध ? मुख्यमंत्री निर्णय घेणार – मंत्री वडेट्टीवार
- संजय राऊतांना अटक करा ; भाजपची मागणी तर राऊत म्हणतात…
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का, सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले
- वाढीव रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना अक्रियाशील घोषित करुन नये, आ. पवार यांची मागणी


