🕒 1 min read
नगर : राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड त्यांच्या मतदारसंघात शिवपट्टण किल्ल्यामध्ये सर्वात उंच असा भगवा ध्वज आज त्यांच्यातर्फे उभारण्यात आला. या ध्वजाची उंची तब्बल ७४ मीटर आहे. आमचा ध्वज हा सर्वसामावेशक असल्याचे आणि सर्व जात-धर्म पंथाच्या पलीकडे जाणारा आमचा ध्वज आहे असे रोहित यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान, कोरोना नियमांना आयोजकांनी अक्षरशः हरताळ फासल्याचे दिसून आले. हजारो नागरिकांची गर्दी यावेळी झाल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमात लोकांनी मास्कचा वापर केलेला नसल्याचे दिसत तर आहेच मात्र दस्तुरखुद्द रोहित पवार हे देखील मास्क शिवाय या कार्यक्रमात वावरताना दिसत आहेत.
सध्या काही प्रमाणात राज्य जरा कोरोनाच्या लाटेपासून सावरले असतांना अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने कोरोना पुन्हा डोके वर काढेल असा अंदाज वर्तविला जात आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढला असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील काही गावात संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे या कर्यक्रमाला परवानगी मिळालीच कशी असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- किरीट सोमय्यांनी घेतली करमुसेंची भेट, आव्हाडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?


