Share

ना सत्ताधाऱ्यांना भान ना विरोधकांना जाण; पवार-मुंडेंच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

Published On: 

बीड : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जराशी ओसरल्याचे दिसत आहे. संभाव्य तिसरी लाट येऊ नये म्हणून नेत्यांसह सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र सत्ताधारी नेते असोत किंवा विरोधक दोन्ही बाजूच्या नेते मंडळींना कोरोनाच्या नियमांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कारण आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगावात आयोजित केलेला दसरा मेळावा असो किंवा खर्ड्यात आ. रोहित पवार यांचा स्वराज्य ध्वज लोकार्पण सोहळा असो या दोन्ही कार्यक्रमात तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले.

पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली असेच काहीसे चित्र रोहित पवार यांच्या कार्यक्रमात देखील पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. या  दोन्ही कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक लोक विना मास्क वावरतांना दिसत होते तसेच सोशल डिस्टंसिंगचा  देखील फज्जा उडाला.

राज्यात सध्या कुठे तरी कोरोनाची महामारी कमी झाल्याची पाहायला मिळत असताना तसेच राज्य सरकारने कोरोना निर्बंधात सुट दिली असल्याने अशा कार्यक्रमात हजारोंच्या जनसागराने गर्दी केल्याने कोरोना महामारी पुन्हा डोके वर वाढेल अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दसरा मेळाव्याला येतांना कोरोनाचे सर्व नियम पाळून यावे असे पंकजा मुंडे यांनी सांगितले असतांना सुद्धा नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केलेले दिसले नाही.

रोहित पवार यांनी आज स्वराज्य ध्वजाचे लोकार्पण जंगी कार्यक्रम घेऊन केले. या कार्यक्रमादरम्यान, कोरोना नियमांना आयोजकांनी अक्षरशः हरताळ फासल्याचे दिसून आले. हजारो नागरिकांची गर्दी यावेळी झाल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमात लोकांनी मास्कचा वापर केलेला नसल्याचे दिसत तर आहेच मात्र दस्तुरखुद्द रोहित पवार हे देखील मास्क शिवाय या कार्यक्रमात वावरताना दिसत आहेत. या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमविल्याने तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती म्हणावी तेवढी बरी नसल्याने या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले  याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!