पुणे- जगावर सध्या कोरोनाचे सावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु झाला आहे. या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्षकरणे चांगलंच महागात पडू शकते म्हणूनच आम्ही आमच्या वाचकांसाठी काही आरोग्य वर्धनकरणाऱ्या काही टिप्स देत आहोत. विविध औषधी वनस्पती,पदार्थ याबद्दल आम्ही नेहमीचआपल्यासमोर उपयुक्त अशी माहिती आणत असतो.
तसं पाहिलं तर लॉकडाउनमुळे लोकांना काही सुविधांचा वापर करणे अशक्य आहे. लॉकडाउनमुळे मार्चपासून महिलावर्ग देखील घरीच आहेत. त्यामुळे स्कीन ट्रीटमेंट, ब्युटी ट्रीटमेंट सध्या घरीच चालु आहेत. महिला घरबसल्या निवांत आहेत त्यामुळे त्यांना स्वताकडे लक्ष द्यायला वेळ आहे.
स्त्रीयांचे सौंदर्य केसांशिवाय अपूर्ण आहे. केसांची वाढ, रंग हे व्यक्तींच्या वयावर व अनुवंशिकतेवर अवलंबून असते. पण केसांची निरोगीपना, चमक ही मात्र केसांची निगा यांवर अवलंबून असते. त्यामुळे केस गळती, कोंडा यावर घरगुती उपाय पाहणार आहोत.
केस गळतीवर उपाय- (कोणत्याही ट्रीटमेंट पूर्वी केस स्वच्छ धुवावेत)
हर्बल ऑइल थोडे गरम करून भांगातून कापसाने लावावे. १५ ते २० मिनिटे हेड मसाज करावा. त्यांनंतर ५ ते ७ मिनिटे स्टीमरने वाफ घ्यावी. ओल्या केसांमध्येच वाफ घ्यावी. दहयात प्रोटीन पॅक मिसळून केसांना लावावा. ४० मिनिटांनी केस धुवावेत.
खोबरेल तेल, एरंडेल तेल, विटामीन ई च्या गोळ्या हे मिश्रण एकत्र करून वापरावे. दररोज संध्याकाळी झोपताना केसांना या तेलाने १५ मिनिटे मसाज करून सकाळी उठल्यावर केस धुवून टाकावे. १५ दिवसात आपल्याला केस कमी गळण्याचा अनुभव येईल.
जास्वंदाची पाने, कडीपत्ता, खाऊची पाने खोबरेल तेलामध्ये एकत्र करावे. ते तेल उकळवून घ्यावे. या पानांचा अर्क तेलामध्ये उतरु द्यावा. ते तेल आठवड्यातून ३ वेळा केसांच्या मुळांना लावून मसाज करावा. यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होइल.
केसातील कोंडा कमी करण्यास उपाय-(कोणत्याही ट्रीटमेंट पूर्वी केस स्वच्छ धुवावेत)
केसातील स्कीन (स्काल्प) ड्राय झाल्यावर केसांमध्ये कोंडा होऊ लागतो. दही दोन दिवस आंबट होण्यासाठी ठेवावे. त्यांनंतर एक तास डोक्यावर लावून ठेवावे. त्यांनंतर केस शंपुणे स्वच्छ धुवावे. दहयातील ॲसेटिक गुणधर्मामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
कोरफड ही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. केसांमध्ये कोंढ्याचे प्रमाण जास्त असेल तर कोरफडीचा गर केसांच्या मुळांना लावावा. १ ते दीड तासानंतर केस स्वच्छ धुवून टाका. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यास केसातील कोंडा कमी झाल्याचे जाणवेल.
एक लिंबाचा रस काढून तो केस धुण्याच्या अगोदर अर्धा तास केसांना लावावा. परंतु केसांना लिंबू सूट होत नसेल तर केसांवर वापरू नये. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याचे मिश्रण केसांना लावले तरीही केसात कोंडा कमी होण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या-
तुळजापूरात जनता कर्फ्युस शंभर टक्के प्रतिसाद
…मग या दांभिक भाजपा नेत्यांना पोटशूळ का व्हावा ? कॉंग्रेस नेत्याची जहरी टीका
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला
शरद पवारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु,’सिल्व्हर ओक’वर पाठवणार १० लाख पोस्टकार्ड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

