Share

राज्य सरकारने नियम डावलून किती लाडक्यांचं लसीकरण केलं,भाजपचा दांडपट्टा सुरूच

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर – महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. कोरोना लसीकरणावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेला या कठीण काळात सुरु असलेले हे हीन दर्जाचे राजकारण उघड्या डोळ्यांनी पाहत बसावे लागत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे. आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काही मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सुरुवातीला फ्रंट लाईनवरच्या लोकांचे लसीकरण करणे आवश्यक होते. परंतु सरकारने नियम बाह्यपणे किती खास लोकांचे लसीकरण केले आहे असा सवाल त्यांनी केला आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारला सुरवातीच्या काळात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसींचा पुरेशा प्रमाणात पुरवठा केला होता. परंतु राज्य सरकारने नियमानुसार लसीकरण न करता खास लोकांनाच लस दिली आहे. त्यातच तीन लाख लसी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने 15 लाख लसींचा हिशोब द्यावा आणि आतापर्यंतच्या पुरवठा केलेल्या लसींची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी शनिवारी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केली.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला राज्यात कोरोनाची स्थिती भीषण होत चालली आहे. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला लस द्यावी,” अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात कोरोनाची स्थिती भीषण आहे. त्यामुळेच मी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची मागणी केली आहे. आज याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व पक्षांची चर्चा केली जाणार आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!