🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून भिन्न विचारसरणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, सर्वाधिक आमदार असून देखील विरोधी बाकावर असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. खासकरून विधिमंडळ अधिवेशनात कोरोना काळातील भ्रष्टाचार, आरक्षण, शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, मंत्र्यांवर होणारे आरोप, सरकारची कामगिरी यावरून भाजपने हल्लाबोल केल्याचं दिसून आलं.
तर, कोरोना संकटाचं कारण देत गेल्यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारने अधिवेशन पूर्णकाळ न घेता ५-६ दिवसातच गुंडाळलं. आता येणारे पावसाळी अधिवेशन हे ५ जुलै पासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन पूर्णकाळ घ्यावं अशी मागणी भाजपने केली आहे. ‘अधिवेशन जवळ आलं की कोरोना रुग्णांचे आकडे वाढतात हे आधीपासून पाहण्यात येत आहे,’ असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
पावसाळी अधिवेशनात आर्थिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा होण्याची गरज आहे. उद्या होणाऱ्या भाजप नेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार आहे. सरकारनं कोणतीही पळवाट न काढता किमान 15 दिवस अधिवेशन घ्यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
अधिवेशन पूर्णकाळ घ्या, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पूर्णकाळ अधिवेशन चालवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे. ‘राज्यापुढे राजकीय, सामाजिक तसेच शेती, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण याविषयिचे प्रश्न उभे राहिले आहेत. यावर सा़गोपांग चर्चा होण्याकरिता विधीमंडळाचं पूर्ण काळ अधिवेशन घेतलं जावं,’ अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे. ‘कोरोना संकटामुळे यापूर्वीचे जवळ जवळ सर्व अधिवेशन अल्पकाळ घेण्यात आले. मात्र, आता कोविड प्रतिबंधक लसीचा ठोस पर्याय आपल्यापुढे आहे. अशावेळी कोविडच्या कारणाने अधिवेशन अल्पकाळात उरकण्यात येऊ नये,’ असं देखील ते म्हणाले आहेत.
आमदारांचं लसीकरण करून घ्यावं !
सिद्धार्थ शिरोळे पुढे म्हणाले, ‘माझ्या माहितीप्रमाणे केंद्रामध्ये 400 हून अधिक खासदारांचे लसीकरण झाले आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये जवळपासळ निम्मे आमदार आणि बहुसंख्य कर्मचारी वर्ग यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत. उरलेल्यांना पहिला डोस देण्यात यावा. हे काम फार आव्हानात्मक नाही. राज्य सरकारने तयारी दाखवली तर सहज शक्य आहे.’
महत्वाच्या बातम्या
- शिक्षकाला गंडविणाऱ्या ‘त्या’ तोतया ‘निजामा’ला पोलीस कोठडी
- पुणे जिंकणार ! आज दुसऱ्या लाटेतील नीचांकी कोरोना रुग्णांची नोंद
- ‘सरकार जनहिताची कामे करतंय; भाजपची भविष्यवाणी खरी ठरत नाही’
- मराठा आंदोलनासाठीचे मूकमोर्चे एका महिन्यासाठी स्थगित ; संभाजीराजेंची घोषणा
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
