मुंबई: काल दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ ला उडवून देण्याची धमकी आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे. दुबईवरुन दाऊदच्या हस्तकाने फोन करून धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर मातोश्रीबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याची जबाबदारी दबंग पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली आहे.
धमकी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.’दाऊदला दम देणारे आणि कधी काळी दाऊदला संरक्षण देणारे सत्तेत असताना धमकीचा फोन आलाच कसा?’ असा खोचक टोला त्यांनी शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
दाऊदला दम देणारे आणि कधी काळी दाऊदला संरक्षण देणारे सत्तेत असताना धमकीचा फोन आलाच कसा????
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 6, 2020
दरम्यान काल भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते.
“आता नवीन नाटक.. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्री मध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्ती वर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल? मग सांगणार आंगवर आले आम्ही उडवून दिले पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे”.
असं निलेश राणे यांनी काल ट्विटरवर म्हटलं होतं.
‘कंगनासारखे उपरे आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन आणि पटानी अस्सल मराठी! हो ना’
याआधीही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा अशाप्रकारे धमक्या देण्यात आल्या होत्या. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने हे शहर अतिशय संवेदनशील मानले जाते. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम देशाबाहेर राहुन मुंबईतील त्याचे अवैध धंदे चालवत असतो. पण आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंच्या काळात अशी धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला ; काँग्रेसचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

