Share

डीव्हिलियर्सला कसे अडकवले जाळ्यात ? हरप्रीतने केला खुलासा

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

पंजाबचा गोलंदाज हरप्रीत ब्रारने या सामन्यात आरसीबीचे महत्वाचे फलंदाज विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सला बाद केले. एकाच आयपीएल सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्स या दोन्ही फलंदाजांना बाद करणारा हरप्रित केवळ सातवा फिरकी गोलंदाज ठरला आहे. हरप्रितपुर्वी हा कारनामा श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, कृणाल पंड्या, नितीश राणा, राशिद खान आणि सुनील नरिन यांनी केला आहे. श्रेयस गोपाळने तर ही कामगिरी तब्बल तीन वेळा केली आहे. या यादीत आता हरप्रीत ब्रारने देखील स्थान मिळवले आहे.

सामन्यानंतर हरप्रीतनं डीव्हिलियर्सला आऊट करण्यासाठी केलेल्या योजनेचा खुलासा केला. ‘डीव्हिलियर्सला मोठे शॉट्स मारण्यापासून अडवणे ही माझी योजना होती. त्यामुळे मी त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचं ठरवलं. याच कारणामुळे मी स्लिपमध्ये फिल्डर उभा केला होता. सुदैवानं डीव्हिलियर्सचा तो बॉल खेळला आणि मला त्याची विकेट मिळाली. अचूक टप्प्यावर बॉलिंग करण्याची माझी योजना होती.’ असं बरारनं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!