Share

भाजपा नेत्याच्या नातेवाईकाला कोणत्याही कारवाई शिवाय कसे जाऊ दिले? सचिन सावंतानीही केले उपस्थित सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केलाआहे.

६ ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB चे भाजप कनेक्शन उघड केले होते आणि आज नवाब मलिक यांनी भाजप युवा मोर्चाचे मोहित कंभोज यांच्या मेहुण्याला ताब्यात घेऊनही सोडल्याचा व्हिडीओ माध्यमांसमोर मांडून खळबळ उडवून दिली आहे.रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा, अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेताना आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत NCB च्या कार्यालयातून बाहेर पडतानाचा व्हिडीओही नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर आणला. क्रुझवर १३०० लोकांवर धाड टाकण्यात आली. ही धाड १२ तास सुरू होती. त्यातील ११ लोकांना ताब्यात घेतले. त्यानंतर अकरा जणांना NCB च्या कार्यालयात आणले होते परंतु त्यापैकी तीन लोकांना सोडण्याचा आदेश दिल्लीवरून नेत्यांनी केल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजप आणि एनसीबीवर टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबई क्रूझ छाप्यात सहभागी सर्व एनसीबी अधिकाऱ्यांवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 59 अन्वये कारवाईच्या मागणीचा पुनरुच्चार करत आहे. नवाब मलिक यांनी उपस्थित केलेले प्रश्न, व्हिडिओ तसेच कागदोपत्री पुरावे षड्यंत्र झाल्याचे सूचित करतात. भाजप व एनसीबी यांच्यातील संगनमतही स्पष्ट दिसते

भाजपा नेत्याच्या नातेवाईकाला कोणत्याही कारवाई शिवाय कसे जाऊ दिले? भाजपा नेता व फरारी आरोपी साक्षीदार कसे बनतात? ज्यांनी या टूरचे आयोजन केले व फिल्मी व्यक्तिमत्वांना बोलावलं ते ड्रग डीलचा भाग कसे नाहीत? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. MVA सरकारने या कटाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!