टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरु आहे. देशात पहिला लॉक डाऊन १४ एप्रिल रोजी संपला तर दुसरा लॉक ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. परतू महाराष्ट्र सरकारने राज्यातील ग्रीन झोनमध्ये काहीअंशी सुट दिली असून ठराविक व्यवसायांना सशर्त परवानगी दिली आहे.
राज्य सरकार जिल्हा हा कोणत्या झोनमध्ये येतो याबाबत निर्णय कसा घेतं या बद्दल सामान्य नागरिक प्रश्न होते आता याब्बद्ल्ची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांनी ट्वीटरवर सांगितले,
‘राज्यात ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.’
राज्यात ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2020
दरम्यान आज पासून राज्य सरकारने शेती, अत्यावश्यक सेवा तसेच काही ठराविक भागातील उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

