🕒 1 min read
मुंबई : औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात उद्योजकाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री तसेच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. उद्योग क्षेत्राच्या संबंधीत अशा प्रकारची गुंडागिरी सहन केली जाणार नसल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. औरंगाबादमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत आपण पोलीस प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कामगाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित कंपनीच्या मालकाला काही लोकांनी मारहाण केली होती. त्या नंतर जिल्ह्यातील सर्वच उद्योजकांनी नाराजी व्यक्त करुन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. उद्योग संघटनांनी याची तक्रार केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही या प्रकरणावर त्वरीत कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
उद्योग क्षेत्रात गुंडगिरी सहन केली जाणार नाही. संभाजीनगर जिल्ह्यात उद्योग क्षेत्र वाढत असताना तिथले वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. राज्य शासन असे प्रकार सहन करणार नाही. अशा प्रकारावर कठोर कारवाई केली जाईल. pic.twitter.com/u6O5JH2Dug
— Subhash Desai (@Subhash_Desai) August 11, 2021
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. औरंगाबादमध्ये उद्योग क्षेत्रात वाढ होत असताना विकासाला खिळ बसवणाऱ्या या घटना असल्याचे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. वातावरण खराब करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल, तर ते सरकार सहन करणार नाही. राज्य सरकार उद्योग क्षेत्राच्या बाजूने खंबीरपणे असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर यापुढे शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ’ , शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा गुंडांना इशारा!
- देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
- भाजपमध्ये साईडलाईन झालेले विखे, हर्षवर्धन पाटील यांनी ‘या’ कारणासाठी घेतली अमित शाहांची भेट
- भाजप आमदाराच्या मतदारसंघात शिवसेनेची रणनीती; दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश!
- चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होणार ? ; ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
