Share

100 गाड्यांचा ताफा घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करणार, गृहमंत्र्यांचा पडळकरांना इशारा

Published On: 

मुंबई : 100 गाड्यांचा ताफा घेऊन दौरा करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मोदी सरकारचा चमत्कार, पेट्रोलपेक्षा डिझेल महाग; काँग्रेस करणार आंदोलन

सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्वांना सारखे आहेत. ते न पाळता आणि मास्क न वापरता कोणीही फिरत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जर पोलिसांकडे तक्रारी आल्या, तर पोलीस त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करतील, असं गृहमंत्री म्हणाले. “इथे सांगलीचे एसपी (पोलिस अधीक्षक) आहेत. याची नोंद त्यांनी घेतली. जे कोणी 100 गाड्या सोबत घेऊन फिरत असतील, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा अनिल देशमुख यांनी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांनी एण्ट्री घेतली होती

दरम्यान, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

औरंगबादेत सलून व्यवसाय सुरु करण्याबाबत संभ्रम कायम

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!