औरंगाबाद : औरंगबादेत सलून व्यवसाय सुरु करण्याबाबत संभ्रम कायम असल्याचे दिसून येत आहे. सलून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांचा अद्याप निर्णयच नाही त्यामुळे दुकाने उघडायचे की नाही याबाबत सलून व्यावसायिक संभ्रमात आहेत. औरंगाबाद रेड झोन असल्यामुळे प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
संजय राऊत, सुशांत सुशांत सिंह राजपूतला ‘हा’ रोल करणार होते ऑफर
दुसरीकडे आजपासून नाशिक जिल्ह्यातील सलून, स्पा, ब्युटी पार्लर सुरु, कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी दिली आहे. नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे. केस कापणे, केस रंगवणे, व्हॅक्सिंग, थ्रेडिंग याच कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्वचेच्या संदर्भातील काम करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
दर वाढवण्या संदर्भात नाभिक संघटनेचा अजून निर्णय झाला नसल्याने पहिलेच दरपत्रक लागू असणार आहे. दरम्यान, राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. आज राज्यात काल, शनिवारी 5318 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परवा, शुक्रवारी राज्यात 5024 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.
चंद्रकांत पाटलांचे ‘चंपा’ म्हणून बारसे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याने केले
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे. यापैकी 84 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

