नवी दिल्ली : ट्विटर आता नव नवीन वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल फोटो ट्विटरने गुरुवारी रात्री काही वेळासाठी हटवला होता. मात्र, नंतर तो पुन्हा दिसू लागला. सांगण्यात येते, की शाह यांचा प्रोफाइल असलेल्या फोटोवर कुणी कॉपीराईटचा दावा केला होता. यानंतर ट्विटरने ही कारवाई केली. यामुळे अनेक आश्र्चर्य चकित झाले आहे. यानंतर ही घटना काही वेळातच सोशल मीडियावरही व्हायरल झाली.
अमित शाह यांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकांउंटच्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तेथे फोटो दिसत नव्हता. प्रोफाइल फोटो च्या ठिकाणी एक ब्लँक पेज दिसत होते. तसेच त्यावर एक मेसेजही लिहिलेला दिसत होता. यात कॉपीराईटअंतर्गत प्रोफाइल फोटो हटवल्याचे सांगण्यात आले होते.
Due to an inadvertent error, we temporarily locked this account under our global copyright policies. This decision was reversed immediately and the account is fully functional: Twitter Spokesperson on Home Minister Amit Shah's account being temporarily locked yesterday evening https://t.co/KVPkyo2Lic
— ANI (@ANI) November 13, 2020
त्यावर, ‘कॉपीराईटच्या रिपोर्टमुळे फोटो हटवण्यात आला आहे,’ असे लिहिलेले होते. मात्र, यानंतर पुन्हा डिस्प्ले पिक्चर दिसू लागला. मात्र, यासंदर्भात ट्विटरकडून अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाकडून ट्विटरवर कारवाई होण्याची शक्यता आहे. ट्विटरने ९ नोव्हेंबरला ‘लेहला’ जम्मू काश्मीरचा भाग दाखवला होता. या प्रकरणी आयटी मंत्रालयाने ट्विटरला नोटीस जारी केली आहे. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अपमान केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, अशी नोटीस ट्विटरला पाठवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “राहुल गांधी विद्यार्थ्यांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत, पण त्यांची योग्यता नाही.”- बराक ओबामा
- खोटे सोने खरे भासवून १३४ जणांनी काही कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलले; आणखी एका बँकेला गंडा!
- ‘भाजयुमो’ ची महत्वाची तिनही पदे नेत्यांच्या पुत्रांना; कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?
- ग्रामीण भागातील रस्त्यांची वाळू वाहतुकीमुळे दुरवस्था; पोपट पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
- त्या पिडीत महिलेला दहा लाखांची मदत; राज्यमंत्री बच्चू कडू यांची घोषणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

