Share

भाजपने पालघरमधील ईव्हीएममध्ये सेटिंग केली; मतदान सुरु असतानाच हितेंद्र ठाकुरांचा गंभीर आरोप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :- भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. भाजप साम, दाम, दंड याचाही वापर करत आहे आणि रडीचा डाव खेळत असून लोकशाहीचा हा घात आहे असेही ठाकूर म्हणाले. आज सकाळी मतदान करायला आल्यावर पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी हा गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली.

पालघर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजप), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या जय्यत तयारीनिशी मतदान चालू झाले असून २०९७ मतदान केंद्रांवर मतदान चालू असून १२ हजार ८९४ कर्मचारी, ४ हजार २१९ सुरक्षा कर्मचारी यासाठी प्रयत्न करत आहेत.

सर्व प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या बाजूने काम करत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला असून आता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मतदानादिवशीच ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!