हिंगोली : हिंगोली तालुक्यामध्ये पट्टेदार वाघाचे अस्तित्व जाणवले असून विदर्भातून आलेल्या वाघाने हिंगोली तालुक्यातील लिंबी शिवारामध्ये चार जनावरे फस्त केल्याचा प्रकार गुरुवारी ( ता.३१) उघडकीस आला आहे. व वन विभागाने वाघाला रेडिओ कॉलर लावल्यामुळे या वाघाचा ठावठिकाणा तर सहा तासाला वनविभागाला मिळू लागला आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये औंढा नागनाथ कळम तालुक्यामध्ये बिबट्याचे अस्तित्व आहे दोन महिन्यापूर्वी एका बिबट्याने कळमनुरी तालुक्यात चांगला घातला होता आखाडे वरील जनावरे फस्त करण्याचा सपाटा लावला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मुलांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
त्यानंतर आता हिंगोली तालुक्यात आज चक्क वाघाचे अस्तित्व चालवली आहे वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयांनी वाघाला रेडिओ कॉलर लावले असल्याने वाघाचा ठावठिकाणा लक्षात येतो विदर्भातील यवतमाळ व पुसद मार्गे पट्टेदार वाघ लिम्बी शिवारात आल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ करण्याने हिंगोलीच्या विभागीय वनाधिकारी कार्यालयातील होती सदर भागाचा ठिकाण कुठे आहे याची माहिती देण्यात आली होती त्यानुसार विभागीय वनाधिकारी केशव बाबळे वनपरिक्षेत्राधिकारी विश्वात टाक यांच्या पथकाने दुपारच्या सुमारास लिंबी भागांमध्ये पाहणी केली यामध्ये वाघाने चार जणारे फस्त केल्याचे आढळून आले यामध्ये बाबुराव पौळ यांच्या मालकीचे तीन तर श्रीराम बेले यांच्या मालकीच्या एका जनावरचा समावेश आहे.
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे वाघाच्या पायाचे ठसे देखील आढळून आले आहेत. वनविभागाने या भागात ट्रॅप कॅमेरा लावला आहे. या शिवाय रेडिओ कॉलर वरूनही वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान या भागांमध्ये वाघ आला असला तरी शेतकरी व शेतमजूरांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र शेतात जाताना एकटे जाऊ नये असे आवाहन विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी केले आहे. तसेच वाघाला या भागातून हुसकावून लावण्यासाठी गस्ती पथक देखील कार्यरत असल्याचे वाबळे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190205487842619392?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190205256728104960?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190204447554539522?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

