🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारताची गोल्डन गर्ल धावपटू हिमा दासने अवघ्या २० दिवसांत पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिमा दासचे कौतुक केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट करून तिला शुभेच्या दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये हिमा दासची महिनाभरातच ५ सुवर्णपदके हि रोहित शर्माच्या एका क्रिकेट वर्ल्ड कपमधिल ५ शतकांच्या बरोबरीची आहेत. हे आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला शक्य झाले नव्हते. हिनाच्या या कामगिरी मुळे भारतीयांचा उर भरून आलेला आहे @HimaDas8 चे अभिनंदन. #Tokyo2020 करिता हार्दिक शुभेच्छा. अस ट्वीट करत क्रिकेटर रोहित शर्मा याच्या विश्वचषकातील कामगिरीशी हिमाच्या कामगिरीची तुलना केली आहे.
हिमा दासची महिनाभरातच ५ सुवर्णपदके हि रोहित शर्माच्या एका क्रिकेट वर्ल्ड कपमधिल ५ शतकांच्या बरोबरीची आहेत. हे आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला शक्य झाले नव्हते. हिनाच्या या कामगिरी मुळे भारतीयांचा उर भरून आलेला आहे @HimaDas8 चे अभिनंदन. #Tokyo2020 करिता हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/glszlrJUB0
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 22, 2019
दरम्यान, हिमाने गेल्या २० दिवसांत पाच सुवर्णपदक जिंकली आहेत . त्यात २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ४ सुवर्णपदके तर ४०० मीटरमध्ये १ सुवर्णपदक जिंकले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
