🕒 1 min read
मुंबई : गेले ६ महिने राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात सद्या कोरोनामुक्तांचा आकडा समाधानकारक असला तरी रुग्णवाढ आटोक्यात येणे गरजेचे आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री, स्थानिक लोकप्राधिनिधी यांच्यापासून ते अनेक बॉलिवूड स्टार्सना कोरोनाने विळखा घातल्याचे दिसून आले होते. आता, राज्यातील आणखी एका महत्वाच्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. गेले काही आठवडे ते अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनासाठी राज्यातील विविध विद्यापीठांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांना विद्यार्थी संघटनांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले होते. तर, याआधी देखील त्यांच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने विलग्नवासात राहावे लागले होते.
आता उदय सामंत यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. “गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले 10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2020
उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. कोव्हिड काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदा शैक्षणिक क्षेत्राला मोठा फटका बसला असून शैक्षणिक वेळापत्रकच कोलमडले आहे. उच्च शिक्षणातील अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अंतिम वर्ष परीक्षांच्या नियोजनावरून विद्यापीठ अनुदान अयोग आणि राज्य सरकार यांच्यात काही मतभेद असल्याचे दिसून आले होते. सुरुवातीला परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेतलेल्या उदय सामंत यांना युजीसी व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अखेर परीक्षांचे आयोजन करावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- नागपुरात कोरोनाचे थैमान, रुग्णांची संख्या पाऊण लाखांच्या घरात जाण्याची शक्यता
- मनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाई करू- अभय आगरकर
- नागपुरात का होतेय तुकाराम मुंढे आणि राधाकृष्णन बी. यांच्या कार्यशैलीची तुलना?
- सिटीस्कॅनचे जादा दर घेत असाल तर आजच सावध व्हा, आरोग्य मंत्र्यांनी दिले कठोर कारवाई करण्याचे आदेश
- तहसिल कार्यालयासमोर पेटवली कृषी विधेयकाची होळी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
