Share

इंधन दरवाढ : आता तू गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?; आव्हाडांची अक्षयवर टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र कायम आजही कायम आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर अधिक महाग झाले आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे.

काँग्रेसमध्ये खांदेपालट,जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर, 9 नवे जिल्हाध्यक्ष

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. दरम्यान, आजही दिल्लीत पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. गेल्या १९ दिवसांमध्ये डिझेलच्या दरात १०.६२ रूपये आणि पेट्रोलच्या दरात ८.६६ रूपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी (२५ जून) मुंबईत पेट्रोलचा दर ८६.७० रूपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ७८.३४ रूपये प्रति लिटर आहे.

याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमार याला काही सवाल करत टोला लगावला आहे. १६ मे २०११ रोजी अक्षय़ कुमारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून एक ट्विट केले होते. त्यात त्याने मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण पुन्हा रॉकेटप्रमाणे इंधनाच्या किमती वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती, असे म्हटले होते.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; सहकारी बँका येणार RBI च्या देखरेखीखाली

आव्हाड यांनी यावरून आता त्याच्यावर निशाणा साधला आहे. तू ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेस का? तू गाड्या वापरणे बंद केलेस का? तू वृत्तपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी, पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याचे आव्हाड म्हणाले. या ट्विटसोबत अक्षय कुमारलाही त्यांनी ट्विटरवर टॅग केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!