Share

Sanjay raut | “बाळासाहेब म्हणायचे, रडायचं नाही, लढायचं…”; संजय राऊतांनी पाठवलं पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) ताब्यात आहेत. त्यांची ईडी कोठडी काल संपणार होती त्यामुळे काल दुपारी त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले. त्यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी देखील पार पडली. मात्र कोर्टाकडून संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत. तर आज राऊतांनी कोठडीतून काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांना पत्र पाठवलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे.

पत्रात संजय राऊत म्हणतात, “जय महाराष्ट्र! म्हणतात ना संकटाच्या काळातच आपले शुभचिंतक कोण आहेत, हे कळतं. केंद्र सरकारने केंद्रिय तपास यंत्रणांना हाताशी धरून माझ्याविरोधात सुरु केलेल्या राजकीय कट कारस्थानात तुम्ही मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझा सत्यासाठी सुरु असलेला लढा सुरुच राहिल. कितीही दबाव आला तरी मी दबावाला बळी पडणार नाही. झुकणार नाही. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, ‘रडायचं नाही, लढायचं.. सत्यासाठी लढायचं.’ या लढ्यात तुम्ही तुमच्या शब्दांमधून, कृतीमधून आणि विचारांमधून मला पाठिंबा आणि आधार दिल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत.”

पत्रात पुढे ते लिहतात कि, “संसदेत आणि संसदेबाहेर यामुद्द्यांवर आवाज उठवल्याबद्दल, माझ्या पक्षाच्या आणि सहकाऱ्यांच्या भूमिकेला सहमती दर्शवल्याबद्दल धन्यवाद! वेळ आणि संयम ही दोन मोठे योद्धे असतात. हाच विचार, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण, उद्धव ठाकरेंचा पाठिंबा तसेच माझ्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांच्या साथीमुळे आपण ही लढाई नक्की जिंकू, असा मला विश्वास आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि लवकरच भेटू. -आपला विश्वासू संजय राऊत.” तर राऊतांनी पाठवलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!