Share

‘दिल्लीत जाऊन आंदोलनाचे ढोंग करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अत्याचारांच्या घटनांवर बोला’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यात आली. मुलीच्या आई -वडिलांच्या म्हणण्या नुसार, ती रविवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास दिल्लीच्या जुन्या नांगल भागात त्यांच्या घरासमोर असलेल्या स्मशानभूमीत कूलरमधून थंड पाण्या आणण्यासाठी गेली होती. त्या नंतर ६.०० वाजेच्या सुमारास स्मशानभूमीतील कर्मचारी व्यक्तीने तिच्या आईला तिचा मृत देह दाखवला आणि सांगितले की पाणी भरताना तिला कुलरमुळे विजेचा झटका बसला. तिच्या डाव्या मनगटात आणि कोपरात जळण्याच्या खुणा होत्या आणि तिचे ओठही निळे होते. मात्र तिच्यावर अत्याचार झाल्याची गंभीर बाब नंतर उघडकीस आली.

या प्रकरणी अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या, पिडीत कुटुंबाची भेट काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी घेतली. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पिडीत कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणावरून केंद्र सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला असून संसदेत देखील याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील मोदी सरकारवर आरोपांची सरबत्ती केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता विरोधकांवर पलटवार केला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आंदोलनाच्या पवित्र्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘दिल्लीतील घटना गंभीर आहेच. पण, महाराष्ट्रात विशेषत: दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पण, त्यावर नितीन राऊत प्रतिक्रिया देत नाहीत.महाराष्ट्रातील इतक्या सर्व घटनांची यादी वाचणेही मला संयुक्तिक वाटत नाही.पण, दिल्लीत जाऊन आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रातील घटनांवर त्यांनी मौन सोडायला हवे. महाराष्ट्रातील घटनांवर बोलायचे नाही, हा ढोंगीपणा योग्य नाही. जे सत्तेत आहेत, ते महाराष्ट्रातील अत्याचाराच्या घटनांबाबत बोलत नाहीत आणि दिल्ली, उत्तरप्रदेशात जाऊन ढोंग करतात,’ अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!