टीम महाराष्ट्र देशा : राज्यात येत्या बुधवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी कोकण आणि गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार तसेच शनिवारी आणि रविवारी मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये सतत होत असलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी पाठविलेल्या बातम्यांनुसार या नुकसानाची पाहणी आणि पंचनामे त्वरेनं करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. धुळे तालुक्यात तसंच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. आधीच कोरड्या दुष्काळाने हैराण असलेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी यावेळी ओल्या दुष्काळामुळे मोठ्या संकटात सापडला आहे.
पुणे शहरात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता
पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190130490180698114?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190141141997371392?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

