Share

राज्याला मुसळधार पावसाने झोडपले

Published On: 

मुंबई : राज्याला मुसळधार पावसाने झोडपले असून महाराष्ट्रासह दक्षिण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये येत्या दहा तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसातपावसाने अनेक जिल्ह्यात दडी मारली होती. मात्र रविवारी संध्याकाळी सहानंतर केरळ, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली असून रविवारी रात्री राज्यातल्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला. पुढील काही तास या भागात ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. कोकण किनारपट्टी काही भागात ही पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. पावसाचा जोर तळकोकणात वाढण्याची शक्यता असल्यानं मासेमारी करणाऱ्यांना आणि समुद्रकिनाऱ्याजवळील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, 10 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह उत्तराखंड तामिळनाडू केरळ कर्नाटक या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

‘आलं रे आलं’ आईपीएलचं वेळापत्रक आलं

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!