टीम महाराष्ट्र देशा : कोकणचे आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यामुळे मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. या नगरसेवकांबाबत सुनावणी पुढे ढकलली आहे.
मनसेतून दिलीप लांडेंच्या नेतृत्वात सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. त्याला मनसेने कोकण आयुक्तांकडे आव्हान दिलं. याप्रकरणाचा निकाल तीन महिन्यात येणं अपेक्षित होतं. मात्र चार महिन्यानंतरही निकाल आला नाही. सातत्याने आयुक्त गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनसे नेते संदीप देशपांडे कोकण आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातचं बाहुलं आहेत अशी विखारी टीका केली आहे.
दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
