पुणे- जगावर सध्या कोरोनाचे सावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु झाला आहे.या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्ष करणे चांगलंच महागात पडू शकते म्हणूनच आम्हीआमच्या वाचकांसाठी काही आरोग्य वर्धन करणाऱ्या काही टिप्स देत आहोत. विविध औषधीवनस्पती,पदार्थ याबद्दल आम्ही नेहमीच आपल्यासमोर उपयुक्त अशी माहिती आणत असतो.
आज आपण लिंबू रोजच्या आहारातील फलाबद्दल माहिती करून घेणार आहोत. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदानआहे. अपचन किंवा अजीर्ण झाले असल्यास लिंबू यावरखूप उपयुक्त आहे.
लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबतलिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना लिंबू मीठ लावून खाण्याचीसवय असते. ती शरीरासाठी अत्यंत अपाय कारक आहे कारण लिंबू आणि मिठाच्या एकत्रितसेवनाने तुमच्या दाताला हानी पोचण्याचा संभव असतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते आणि शौचास साफ होते.
लिंबू पाणी शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी मदतकरतं आणि शरीर आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करत.वाळलेले लिंबू मधात घालून चाटणम्हणून घेतल्यास उचकी तसेच उलटी थांबण्यास मदत होते.अंगाला खाजसुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून चोळावा.
महत्वाच्या बातम्या-
कोणी चंपा, टरबुज्या म्हणलं तर खपवून घेऊ नका, पलटवार करा: चंद्रकांत पाटील
पवार बकरी ईदसाठी पुढे पुढे नाचतायत, तर मुख्यमंत्री…भाजपा आमदाराने केली खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

