मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी.’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच अधिराज्य गाजवलं. आज ही तितक्याच ओढीने हा चित्रपट पाहिला जातो. याबद्दल ‘कधी ही पहा, कुठूनही पहा, कितीही वेळा पहा, निखळ मनोरंजन, केवळ अद्भुत कलाकृती.’ असे अभिनेता स्वप्नील जोशी यांनी त्याच्या ट्विटद्वारे शेअर केले आहे.
‘अशी ही बनवाबनवी’ २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच अधिराज्य गाजवलं.आज ३३ वर्ष पूर्ण होत असून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्याकाळी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागले होते. आज ही तितक्याच ओढीने हा चित्रपट पाहिला जातो. अभिनेता अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन व सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आदीं कलाकारांची तगडी फौज या चित्रपटात झळकली होती.
*अशी ही बनवाबनवी* !
माझ्यासाठी, सर्वोत्तम मराठी सिनेमांपैकी एक ! आज release होऊन 33 वर्ष झाली ना!!? वाटतच नाही ! कधीही पहा, कुठूनही पहा, कितीही वेळा पहा, निखळ मनोरंजन, केवळ अद्भुत कलाकृती !!!
Btw, तेव्हा पासून धनंजय माने सदैव इथेच (आमच्या हृदयात) राहतात !!
संपूर्ण टीमला सलाम !!! pic.twitter.com/ZIeZgqcJvh— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) September 23, 2021
स्वप्नीलने ट्विटद्वारे म्हणाला, माझ्यासाठी, सर्वोत्तम मराठी सिनेमांपैकी एक! आज हा सिनेमा रिलीज होऊन सुमारे ३३ वर्ष झाली ना, वाटतच नाही कधी ही पहा, कुठूनही पहा, कितीही वेळा पहा, निखळ मनोरंजन, केवळ अद्भुत कलाकृती. तेव्हांपासून धनंजय माने सदैव इथेच (आमच्या ह्रदयात) राहतात. सचिन, अशोकमामा, लक्ष्यामामा, सुप्रियाताई, निवेदिताताई, प्रियाताई आदींस संपूर्ण टिमला सलाम असं ही ट्विटद्वारे शेअर केले.आज हा चित्रपट ऑनलाईन स्वरूपात सहज पहायला मिळतो मात्र त्या काळी थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची मजाच वेगळी होती. विशेष म्हणजे त्याकाळी हा चित्रपट तीन कोटींचा गल्ला जमवला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘केवळ राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा; अन्य कुठलाही प्रस्ताव नाही’, महसूलमंत्र्यांचे स्पष्टीकरण
- ‘अतिशय भयंकर आणि संतापजनक; अत्याचारांच्या प्रकरणामुळे चीड येतेय’, फडणवीसांचा संताप
- भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा दबदबा होता; चंद्रकांतदादांचा दावा
- ‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
- ‘फडणवीस आमचा मान ठेवतील, शब्द मोडणार नाहीत’, राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांना विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

