सांगली: राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या या निर्णयावर भाजप आक्रमक झाले आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर यावरुन टीका केली आहे. भाजपनंतर आता सांभाजी भिडे यांनी देखील ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.
राज्यातील वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून आता संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी थेट पंतप्रधानांकडे (PM Narendra Modi) दारू बंदीची मागणी केली आहे. संभाजी भिडे म्हणाले, नरेंद्र मोदी सरकार खरोखर भगवंताची कृपा म्हणून मिळालं आहे आपल्याला. अतुलनीय. लालबहादूर शास्त्री जसे चांगले होते, तसेच हे आहेत. मी पंतप्रधानांचं मन जाणतो. त्यांनी खरोखर या देशातल्या दारूला कायमची तिलांजली देणारा ठराव लोकसभेत करून घटनेत दुरुस्ती करावी, अशी मागणी भिडे यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे यांनी स्वर्गीय आर. आर. पाटील (R. R. Patil) यांची देखील आठवण काढली. त्यांच्या बद्दल बोलताना संभाजी भिडे म्हणाले, मला आठवण होते आर. आर. आबांची. डान्सबारचा मुद्दा होता. त्यांनी मंत्रीमंडळात सगळ्यांच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली. आज आर आर आबा असते, तर सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय होऊ दिला नसता. यातून नेमकं काय साधायचंय ते नेमकं कळत नाहीये. असे निर्णय झाल्यानंतर कुणाला राग येत नाहीये, असं संभाजी भिडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

