सांगली: राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या या निर्णयावर भाजप आक्रमक झाले आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर यावरुन टीका केली आहे. भाजपनंतर आता सांभाजी भिडे यांनी देखील ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.
संभाजी भिडे म्हणाले, राज्य सारकारचं हे पाऊल सर्वनाशाच्या दिशेने पडलेलं आहे. या देशातली दारू संपली पाहिजे १०० टक्के. आपण दारूचा जर अशा पद्धतीने मुक्तसंचार होऊ देत असू, तर गांजाची शेती करण्याला आपण का आडवं जायचं? सर्रासपणे अफू, गांजाची शेती करून आपला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापारातून पैसा मिळवू शकेल. हेसुद्धा करायला हरकत नाही असं म्हणणारा बेशरम समाज निर्माण होतोय. पण ते जमणार नाही. त्याच्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत, अशी संतप्त टीका त्यांनी केली आहे.
राज्यातील वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून आता संभाजी भिडे यांनी थेट पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी केली आहे. संभाजी भिडे म्हणाले, नरेंद्र मोदी सरकार खरोखर भगवंताची कृपा म्हणून मिळालं आहे आपल्याला. अतुलनीय. लालबहादूर शास्त्री जसे चांगले होते, तसेच हे आहेत. मी पंतप्रधानांचं मन जाणतो. त्यांनी खरोखर या देशातल्या दारूला कायमची तिलांजली देणारा ठराव लोकसभेत करून घटनेत दुरुस्ती करावी, अशी मागणी भिडे यांनी केली आहे.
कोण आहेत संभाजी भिडे
भिडे गुरुजी किंवा संभाजी भिडे या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे असल्याची माहिती आहे. संभाजी भिडे ८५ वर्षांचे असून ते सांगलीत राहतात. त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील सबनीसवाडी आहे. संभाजी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते, मात्र त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटना उभी केली.
महत्वाच्या बातम्या:
भय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी
पीटरसनने पंतप्रधान मोदींच्या पत्राला दिले हिंदीत उत्तर! म्हणाला, “आदरणीय मोदीजी, मुझे…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

