Share

‘इसने मेरी बहन को मारा म्हणत’ डॉक्टरच्या पोटात खूपसला चाकू;औरंगाबादेतील धक्कादायक घटना!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : इसने मेरी बहन को मारा म्हणत एका अज्ञात व्यक्तीने शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉ. अब्दुल राफे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबादेत समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून डॉ. आपटे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिडको पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक खोलात जाऊन तपास करत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय डॉ. अब्दुल राफे हे कार्यरत आहेत. ते शहरातील कॅनॉट भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. बुधवारी कामावरून घरी परतल्यानंतर एक व्यक्ती पोटदुखीच्या बहाण्याने त्यांच्या घरात शिरली. यावेळी चिठ्ठीवर गोळ्यांची नावे लिहून घेण्याच्या बहाण्याने आलेल्या या व्यक्तीने राफे यांच्या नकळत त्यांच्या पोटात चाकू खुपसला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डॉक्टर राफे गंभीर जखमी झाले आहेत.

चाकू खूपसल्यानंतर हा हल्लेखोर पळून जात असतांना परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. त्यावेळी इसनो मेरी बहन को मारा है म्हणत नागरिकांच्या हाताला झटका देत त्या ठिकाणाहून त्यानो पळ काढला. मात्र या सर्व झटापटीत आपली दुचाकी तो अपार्टमेंटच्या खालीच सोडून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिडको पोलिस ठाण्याचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर दुचाकी कर्नाटकातील गुलबर्गा येथील असल्याची माहिती हाती आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!