Share

कौतुकास्पद : साध्या पध्दतीने विवाह करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली ५१ हजार रुपयाची मदत !

Published On: 

🕒 1 min read

प्रदीप मुरमे : निलंगा येथील प्रतिष्ठित व्यापारी तानाजी माकणीकर (सुर्यवंशी ) यांनी नुकतच आपल्या मुलाचा अत्यंत साध्या पध्दतीने विवाह करुन कोरोना या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपयाची मदत देवू करुन समाजासमोर एक आदर्श घालून दिला ! तानाजी माकणीकर यांचा मुलगा सुनील आणि श्रध्दा हे पवित्र विवाह बंधनाच्या रेशीम गाठीत बांधले असून या नव वधू- वराने ५१ हजार रुपयाचा धनादेश उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे सूपूर्द केला.

माकणीकर परिवार म्हणजे तसं निलंगा तालुक्यातील एक श्रीमंत घराणे होय.त्यांनी ठरवलंच असत तर लाॕकडाऊनच्या नंतर आपल्या मुलाचा अत्यंत थाटामाटात शाही विवाह सोहळा पार पाडून श्रीमंतीच दर्शन घडविता आले असते.परंतु कोरोनाचे संकट विचारात घेता सामाजिक भान ठेवत माकणीकर कुटूंबाने कसलाही बडेजाव न करता अत्यंत साध्या पध्दतीने लग्न करुन सामाजिक बांधीलकीचे सुरेख दर्शन घडविले!

शाही विवाह सोहळा म्हणजे प्रतिष्ठा.श्रीमंतीच एक लक्षण असं जणू समाजात एक समीकरण बनत चालल आहे.गर्भ श्रीमंत लोकांच्या मुला-मुलींचे शाही विवाह सोहळे समाजात पार पडत असतात.या शाही विवाह सोहळ्याचे अनुकरण दुर्देवाने मध्यमवर्गीय लोकांकडून होताना दिसत आहे आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही – तृप्ती देसाई

मध्यमवर्गीय कुटूंबातील अनेकजण या खोट्या प्रतिष्ठेपोटी मुला-मुलीचा थाटामाटात विवाह सोहळा पार पाडण्यासाठी कर्ज काढतात प्रसंगी जमीन जुमला विकतात हे कटू सत्य आहे.त्यामुळे लग्नातील बडेजाव या खोट्या प्रतिष्ठेला समाजातील अनेकजण बळी पडताना दिसतात.

मुलीचा विवाह ही मुलीच्या पित्यासाठी आज एक मोठी सामाजिक समस्या बनून गेली आहे.लग्न सोहळा थाटामाटात पार पाडणे या सारख्या खोट्या सामाजिक प्रतिष्ठेला फाटा देत माकणीकर सारख्यांनी घालून दिलेला लग्नाचा आदर्श पाळल्यास लग्न सोहळा अत्यंत कमी खर्चात पार पडेल.माकणीकर यांच्या प्रमाणेच अनेकांनी या स्तुत्य सामाजिक उपक्रमासाठी पुढे येणे आज काळाची गरज बनली आहे.असे झाल्यास लग्न समारंभ ही खर्चिक जबाबदारी राहणार नाही तर ख-या अर्थाने एक सामाजिक आंनदोत्सव बनल्याशिवाय राहणार नाही,हे मात्र निश्चितच!

आईने काळजी घेतली नाही म्हणून मावशीने काळजी घेतली, थोरातांचा योगींना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!