Share

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही – तृप्ती देसाई

Published On: 

पुणे : राज्यात रविवारी (24 मे) कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार गेला आहे. तर आज एकाच दिवशी तीन हजारहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहे. राज्यात आज 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्य़ातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.

रविवारी दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या 1635 इतकी झाली आहे.राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असल्याचे चित्र असून मुख्यमंत्र्यांना नसणारा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामे कशी करवून घेतली जातात याचा अनुभव नसल्याचा हा मुद्दा आता महाराष्ट्रासाठी अतिशय डोकेदुखीचा विषय ठरत आहे. याशिवाय राज्यसरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्ष आणि मंत्र्यांमध्ये देखील समन्वय नसल्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे.

‘सण कसा साजरा करायचा याचे उत्तम उदाहरण मुस्लिम समाजाने सर्वांना दाखवून दिले’

या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. या चर्चेला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी तोंड फोडले आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या,आपल्या देशात कोरोनाचे पेशंट महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहेत.महाराष्ट्रात सध्या 50 हजाराहून जास्त कोरोनाच्या पेशंटची संख्या झाली आहे .तसेच मृत्यूचे प्रमाणही दीड हजारापेक्षा जास्त आहे.४ मे ला दारूची दुकाने सुरू केल्यापासून गर्दीमुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली तसेच राज्यात गुन्हेगारीचं प्रमाणही वाढत चालले आहे.

पुढे त्या म्हणाल्या,महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन हजाराहून जास्त पेशंट सापडत आहेत .ज्या पद्धतीने कोरोनाचे पेशंट वाढत आहेत असेच पेशंट जर पुढील दहा दिवसात वाढत राहिले तर राज्य सरकारला ही परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही ,म्हणून राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता महाराष्ट्रात नाकारता येणार नाही.

आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात संपूर्ण राज्यात ठरतोय लक्षवेधी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!