🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठ्याप्रमाणावर विविध मुद्यांवरून राजकारण देखील सुरु आहे. बकरी ईद दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि आता याच मुद्द्यावरून राजकारण सुरु झाले आहे.
नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी त्यांच्या जीवनात बकरा कधी ऑनलाइन खरेदी केला आहे का? कुर्बानीच्या बकरा घेण्याची पद्धत वेगळी आहे. तो बघून घ्यावा लागतो, ही बाब त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे का? या खात्याचे मंत्री सुनिल केदार यांना विश्वासात घेतले नाही. फक्त आठ ते दहा आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतात. फक्त मुस्लिम समाजाला मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका भाजपचे हाजी अरफात शेख यांनी केली.
तर दुसऱ्या बाजूला बकरेच शहरात येणार नसतील तर कुर्बानी होणार कशी? यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी संतप्त झाले आहेत.’आम्ही ज्या सरकारला मदत केली, ज्यांना हार म्हणून गळ्यात घातले, तेच आता साप बनून आम्हाला चावत आहेत. प्रत्येक नियम पाळण्याची तयारी मुस्लिम समाजानं दर्शवली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची ग्वाही दिली आहे. घरात नमाज पठण होणार आहे. कुर्बानी कमीत कमी केली जाणार आहे. पण बकरे येऊच दिले जात नाहीत, तर कुर्बानी कशी होणार, असा प्रश्न आहे.
कोणी आमचं ऐकायलाच तयार नाही. आठ-आठ मंत्र्यांनी जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांचं कुठलंही उत्तर आलेलं नाही. लोकांनी पैसे जमा करून बकरे आणले होते. ते विकून मुलांची लग्न करू. शाळेची फी भरू, अशी आस हजारो लोकांनी बाळगली होती. पण या सर्वांच्या आशेवर ठाकरे सरकारनं पाणी फेरलं आहे,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.
पक्षश्रेष्ठींची माफी मागा आणि पुन्हा पक्षात या; गेहलोत यांची पायलट समर्थक आमदारांना ऑफर
पंतप्रधानांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील आहे’
उद्धव ठाकरे हे राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी काही हरकत नाही – पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
