मुंबई : सद्या पावसाळी अधिवेशन सुरु असून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणौतने ठाकरे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलेला पाहायला मिळाला. यानंतर हा वाद टोकाला गेल्याचे दिसून आले असून आजच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात यावर घमासान पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना सभागृहात आक्रमक झाली.
यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेसह ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ” ठाकरे सरकार सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात आहे. या प्रकरणी तपासाबद्दल पहिल्या दिवशीपासून टीका करणाऱ्या अर्णव गोस्वामींविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव करण्यात आला आहे. वक्तव्य स्वातंत्र्य दाबले जात असून मी याचा निषेध करतो.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
Thakrey government is against everyone who is raising voice in Sushant singh Rajput case. Issued breach of privilege notice against Arnab Goswami who is spearheading investigation of this case from day one. I condemned this undemocratic act of suppressing freedom of speech. pic.twitter.com/N26JrZlJe6
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 8, 2020
महत्वाच्या बातम्या:-
विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या निलम गोर्हे यांची बिनविरोध निवड
अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, सभागृहात शिवसेना आक्रमक…
आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या पतीला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

