नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, देशातील प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी आजच्या भारत बंदला पाठींबा दिला आहे. यामध्ये आता भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने देखील शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे. हरभजनने शेतऱ्यांबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये हरभजने लिहिले आहे की, ‘शेतकऱ्यांमुळेच भारत देश आहे.’ यानंतर हरभजनने भारताचा झेंडा पोस्ट केला आहे. हरभजनच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगलाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हरभजनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.
किसान से ही हिंदुस्तान है ????????
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 8, 2020
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारत बंद : रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन; मलकापूरात रेल्वे अडवली
- डिसले गुरुजींच्या आई-वडिलांचा हसन मुश्रीफ यांच्याकडून सत्कार
- शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन उभा राहिला ‘मुंबईचा डबेवाला’, भारत बंदला पाठींबा !
- ‘शेतकऱ्यांची एवढी काळजी वाटते तर मग चर्चेवेळी शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित का होते?’
- भारतीय वंशाच्या ‘या’ नशीबवान व्यक्तीला सर्वात प्रथम मिळणार कोरोनाची लस

