बीड : गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज यांचा आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. रविवारी दुपारी महाराजांनी हा व्हिडिओ समाजमाध्यमांत अपलोड करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी महाराजांचा शोध घेतला.
३० आणि ३१ जानेवारी रोजी मंदिर परिसरातील एका कुटुंबाच्या घरी हनुमान महाराज गेले होते. या कुटुंबातील १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप महाराजांवर करण्यात आला होता. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, हनुमान महाराज तेव्हापासून फरार होते. रविवारी दुपारी त्यांनी व्हिडिओ जारी करत आपल्याविरोधात कट रचला गेला असून खोटे आरोप केल्याचा दावा केला.
मी निर्दोष आहे. मला मारहाण करून, व्हिडिओ करून ५ लाखांची मागणी केली. पैसे न दिल्याने गुन्हा नोंदवला. मला जगायची इच्छा नाही, मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे, असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत महाराजांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- “पंतने आपला नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे, त्यात कोणताही बदल करु नये”


