Share

‘मोईन अली क्रिकेटमध्ये नसता, तर आयसिसला जॉईन झाला असता’

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे. दरम्यान नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या बांगलादेशच्या बंडखोर लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक ट्विट करत वादग्रस्त विधान केलं होत.

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार मोईन अली हा ‘जर मोईन अली क्रिकेटमध्ये नसता, तर नक्कीच सिरीयाला जाऊन आयसिसला जॉईन झाला असता’ असं ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे.

दरम्यान सध्या दोन दिवसांवर आलेल्या आयपीएलच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्वातील हरहुन्नरी क्रीडापटूचा थेट दहशतवादी संघटनेशी संबंध जोडल्याने जगभरातील चाहते खवळले आहेत. तसेच क्रिकेट जगतातून देखील यांच्यावरती टीका करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!