Share

शरद पवार यांनी घेतला कोरोना लशीचा दुसरा डोस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : करोना संक्रमणाचा देशभर होणारा फैलाव चिंतेत अधिक भर टाकतोय. आज सकाळी समोर आलेली करोनाची आकडेवारी धोक्याची घंटा ठरतेय. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १५ हजारांच्या घरात नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. अनेक नेते स्वतः पुढे येत लसीकरण करवून घेत आहेत.यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. दि. १ मार्च रोजी शरद पवार यांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

योगायोग म्हणजे आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रत्येकाने आपापले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जे.जे. रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा मोरे यांनी लस दिल्याबद्दल साहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व वैद्यकीय पथक उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून आत्तापर्यंत 80 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. मात्र, राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल दिल्या आहेत. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन आणि समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!